Madha Loksabha Election : रणजितसिंह निंबाळकरांचा माढ्यात भेटीगाठींचा सिलसिला

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील समर्थकांचे होणारा वाढता विरोध पाहता माढा लोकसभा मतदारसंघातील भेटीगाठींवर भर दिलेला आहे.
ranjitsinh naik nimbalkar
ranjitsinh naik nimbalkarsakal

माढा - माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढ्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे व जिल्हा संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांची भेट घेतली असून निंबाळकरांचा माढ्यातील भेटीगाठीचा सिलसिला वाढलेला आहे.

भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील समर्थकांचे होणारा वाढता विरोध पाहता माढा लोकसभा मतदारसंघातील भेटीगाठींवर भर दिलेला आहे. नुकतीच त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

तर नाईक-निंबाळकर यांचे समर्थक असणारे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांचीही रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी सोमवारी (ता. १) भेट घेतली असून श्री. चवरे यांची ही तिसरी भेट आहे. याशिवाय काँग्रेसचे माजी आमदार अॅड. धनाजीराव साठे यांची रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ता. १ रोजी भेट घेतली असून निंबाळकर यांच्या माढ्यातील भेटीगाठी वाढल्या असून महायुती व महाआघाडीतील नेत्यांनाही ते भेटत असल्याने नेमक्या कोणत्या राजकीय चर्चा होतात व तालुक्यात महायुती व महासिकास आघाडीत नेमक्या कोणत्या घडामोडी होतात याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत.

साठे-निंबाळकर दुसरी भेट

काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे यांचा ता. १ रोजी वाढदिवस असल्याने कदाचित वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने निंबाळकर यांनी अॅड. साठे यांची भेट घेतली असावी, अशी चर्चा. मात्र मागील काही दिवसांतील साठे व निंबाळकर यांच्यातील ही दुसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय चर्चा होतात. याबाबत उत्सुकता असून निंबाळकरांचा हा भेटीचा सिलसिला वाढत चाललेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com