Minister Pratap Sarnaik: बेकायदा कला केंद्रावर कारवाई करा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक;'लोककलेच्या नावाखाली घेऊ नका गैरफायदा'
No Misuse in the Name of Folk Art: लोककलेच्या नावावर शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना लुबाडता येणार नाही. कोणतेही बेकायदा प्रकार प्रशासनाने खपवून घेऊ नयेत. लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपली लोककला आहे. लावणीबद्दल सर्वांना आदर आहे.
सोलापूर: लोककलेच्या नावाखाली धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात कला केंद्रांचे पेव फुटले आहे. लोककलेच्या नावाखाली कोणतेही बेकायदा प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. बेकायदा कला केंद्रावर कारवाई करा, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.