सांगोला - सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोल नाक्यावर आज मंगळवार (ता. १) रोजी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार विरोध नोंदवला. शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर सकाळी ११ वाजता हे आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.