

Political Strategy Meets Personal Bond: Deshmukh Joins Raut’s Campaign Drive
sakal
सोलापूर: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी (ता. ८) आमदार विजयकुमार देशमुख यांची पुन्हा भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही चौथी भेट असून, पक्षनिष्ठेसोबतच मैत्रीखातर आमदार देशमुख प्रचाराच्या मैदानात सक्रिय झाल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले.