Minister Pratap Sarnaik: रवींद्र धंगेकर हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली पाठराखण
Shiv Sena’s Rising Firebrand: हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात सुरू असलेल्या राजकीय वादावर मंत्री सरनाईक यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. पुण्यात भाजप-शिवसेनेमधील अंतर्गत वाद विकोपाला गेलेला आहे.
पंढरपूर : माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेचा आक्रमक चेहरा आहे. बरेच खाचखळगे खाल्लेले आहेत. त्यांना पुण्याच्या राजकारणाची चांगली जाण आहे, असे रोखठोक विधान करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी धंगेकर यांनी आज येथे पाठराखण केली.