शेतकऱ्यांना दिलासा: पाणी आळगी बंधाऱ्यात 

algi barej
algi barej
Updated on: 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडण्याचा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागील आठवड्यात उजनीतून पाणी सोडले आहे. ते पाणी भीमा नदीतून मजल दरमजल प्रवास करत अखेर काल शनिवारी रात्री आळगी बंधाऱ्यात दाखल झाले. आज रात्री आळगे बंधारा भरून पाणी खानापूरच्या दिशेने प्रवाहित झाले. आज रविवारी सायंकाळी पाच वाजता खानापूर बंधाऱ्यात पाणी पोचल्याची माहिती मिळाली आहे. पुढे तीन हजार 100 क्‍युसेक प्रति सेकंद वेगाने प्रवाहित होत आहे. 

पाणी टंचाईपासून दिलासा 
मधले काही प्लेट्‌स काढण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी सोमवारी पहाटे हिळ्ळी बंधाऱ्यात दाखल होईल अशी शक्‍यता आहे. त्या बंधाऱ्यात आवश्‍यक तेवढे पाणी साठविल्यानंतर अगोदरच्या खानापूर बंधाऱ्यातील उर्वरित प्लेट्‌स लावण्यात येतील. मागील महिनाभरापासून आळगी वगळता खानापूर व हिळ्ळी बंधाऱ्यावरील भीमा नदीपात्रात पाण्याची मोठी टंचाई जाणवत होती. 

शेतकरी व ग्रामस्थ समाधानी 
आता उजनीतून उन्हाळी आवर्तन म्हणून भीमा नदीकाठच्या आळगी (हिंगणे), खानापूर आणि हिळ्ळी या तीन बंधाऱ्यांत ऐन मोक्‍याच्या उन्हाळ्याचा काळात पाणी सोडल्याने शेतकरी व ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे. पाणी आल्याने आगामी मे व जून महिन्यांच्या कालावधीत नदीकाठच्या ऊस, चारा आणि पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभर शेतकरी नदीपात्रातील विद्युत मोटारी, वायर व अन्य साहित्य काढताना दिसले. 

पाणी दोन महिन्यांपर्यंत पुरेल 
उजनीतून सोडलेल्या पाण्याला प्रवाह जास्त असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. कार्यकारी अभियंता रमेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार या पाण्याने तीन बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहेत. 
या भागास आलेले पाणी येत्या दोन महिन्यांपर्यंत पुरेल. 
-प्रफुल्ल ढवळे, 
शाखा अभियंता, अक्‍कलकोट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com