esakal | चार हुतात्म्यांचे बलिदान हा देशगौरवाचा ठेवा : देवूसिंह चौहान | Solapur News
sakal

बोलून बातमी शोधा

चार हुतात्म्यांचे बलिदान हा देशगौरवाचा ठेवा : देवूसिंह चौहान

येथील नियोजन भवनात सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोस्टाने तयार केलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यमंत्री चौहान यांच्या हस्ते झाले.

चार हुतात्म्यांचे बलिदान हा देशगौरवाचा ठेवा : देवूसिंह चौहान

sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर : हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या (Indian Independence Day) अमृतमहोत्सवी वर्षात नागरिकांनी देशाप्रति असलेल्या प्रत्येक कर्तव्याचे पालन करत असताना रचनात्मक उपक्रम व कार्यक्रमातून लोकशक्ती सिद्ध करावी. सोलापूरच्या (Solapur) चार हुतात्म्यांचे (Four martyrs) बलिदान हा देशगौरवाचा ठेवा आहे, असे मत केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान (Devusinh Chouhan) यांनी व्यक्त केली.

येथील नियोजन भवनात सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोस्टाने तयार केलेल्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यमंत्री चौहान यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, पोस्टाचे सीपीएम हरीश अग्रवाल, मधुमिता दास, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित होते. तर ऑनलाइन पद्धतीने खासदार संजय धोत्रे उपस्थित होते.

राज्यमंत्री चौहान पुढे म्हणाले, देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व त्यागाची भावना या हुतात्म्यांमध्ये होती. याच भावनेने प्रत्येक नागरिकाने देशाची संसाधने जतन व संवर्धन करणे, इतरांना रचनात्मक सहकार्य करणे, जबाबदारीच्या भावनेतून कर्तव्याचे पालन करणे या पद्धतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी झाले पाहिजे. वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत या माध्यमातून लोकसेवेचा जागर व्हावा. लोकशक्ती हीच कोणत्याही सरकारची खरी शक्ती असते. या लोकशक्तीचे प्रदर्शन रचनात्मक उपक्रमातून केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: कोरोनामुळे वडिलाचं छत्र हरपलं; तरी मुलीनं त्यांचं स्वप्न साकारलं

खासदार महास्वामी यांनी सांगितले की, सिद्धरामेश्‍वरांच्या या तपोभूमीत या हुतात्म्यांच्या बलिदानाने चार दिवस स्वातंत्र्याचा अनुभव जनतेने घेतला. ही ऐतिहासिक घटना देशाच्या इतिहासात विस्मृत झाली. या प्रेरणादायी घटनेचा समावेश देशाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार संजय धोत्रे यांनी या हुतात्म्यांच्या कार्यास अभिवादन करत उपक्रमाचे कौतुक केले. आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले की, चार हुतात्म्यांचे बलिदान ही घटना ऐतिहासिक आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मांडलेली मते या घटनेचे गांभीर्य दाखवतात. पण लोकसभेत या घटनेबाबत चर्चा झाली नाही. लोकांमध्ये इंग्रजांची दहशत वाढावी म्हणून या हुतात्म्यांना गड्डा यात्रेच्या काळात फाशी देण्यात आली. हा प्रेरणादायी इतिहास देशातील नव्या पिढीच्या समोर अभ्यासक्रमातून मांडला जावा.

हेही वाचा: Solapur : कोरोना काळातही 'ही' शाळा 70 दिवसांपासून आहे अखंड सुरू!

हुतात्म्यांच्या वारसांचा गौरव

यावेळी चार हुतात्म्यांचे वारसदार कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. तेव्हा राज्यमंत्री चौहान यांनी या कुटुंबीयांना पाचारण करून त्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच दीपप्रज्वलन सोहळ्यात त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. नंतर टपाल तिकिटाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांच्या समवेत सहभागी होऊन त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.

loading image
go to top