

Major Electricity Upgrade in Penur Brings Relief to 500 Farmers
sakal
-राजकुमार शहा
मोहोळ: पेनुर ता मोहोळ येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्रात नव्याने बसविलेला पाच एम व्ही ए चा ट्रान्सफार्मर सोमवार ता 04 रोजी कुरुल येथील उपविभागीय कार्यालयातील महावितरण चे सहाय्यक अभियंता सुशील देवकर, मोहोळचे सहाय्यक अभियंता नागेश खडतरे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. यामुळे पेनुर उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या गावातील सुमारे साडे चारशे ते पाचशे शेतकऱ्यांना सुरळीत व अखंडित वीज पुरवठा होणार आहे.