

Farmers visiting talathi office for offline crop registration process.
Sakal
मंगळवेढा: खरीप हंगाम २०२५ मध्ये मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दिला आहे. आता अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन नोंद केली जाणार आहे. त्यासाठी बुधवारपर्यंत (ता. २४) तलाठ्यांकडे अर्ज करावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.