
Farmer inspecting damaged crops after heavy rainfall as relief remains stalled due to pending panchanama reports.
Sakal
सोलापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबरमध्येच २७ जिल्ह्यांमधील ३५ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, अशी ग्वाही सरकारने दिली. मात्र, भरपाईसाठी पंचनाम्याचा अंतिम अहवाल बंधनकारक असून शेतात पाणी असल्याने अनेक गावांमधील पंचनामेच करता आलेले नाहीत. अजूनपर्यंत एकाही जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.