सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

अनोळखी क्रमांकावरून आपल्याला फोन येतो किंवा लिंक येते. त्यातून आपल्याला आमिष दाखविले जाते. त्याची खात्री केल्याशिवाय त्यावर क्लिक करू नका, अन्यथा आपल्या बॅंक खात्यातील संपूर्ण रक्कम लंपास होऊ शकते, असे आवाहन सोलापूर शहर सायबर पोलिसांनी केले आहे.
cyber crime

cyber crime

solapur sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : अनोळखी क्रमांकावरून आपल्याला फोन येतो किंवा लिंक येते. त्यातून आपल्याला आमिष दाखविले जाते. त्याची खात्री केल्याशिवाय त्यावर क्लिक करू नका, अन्यथा आपल्या बॅंक खात्यातील संपूर्ण रक्कम लंपास होऊ शकते, असे आवाहन सोलापूर शहर सायबर पोलिसांनी केले आहे.

३ ते २७ ऑक्टोबर या काळात सायबर पोलिसांनी सुमारे ५० हजार जणांना सायबर सुरक्षेचे धडे दिले आहेत. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार ऑक्टोबर महिना सायबर सुरक्षेच्या जनजागृतीचा जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्या नेतृत्वात शहरभर जागोजागी जनजागृती केली जात आहे.

शहरातील शाळा-महाविद्यालये, वर्दळीच्या ठिकाणी (एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन, विमानतळ) लोकांना सायबर सुरक्षेचे धडे दिले जात आहेत. त्याठिकाणी सायबर जनजागृतीचे फलकही लावण्यात आले आहेत. याशिवाय सोलापुरातील मधला मारुती चौक, चार हुतात्मा पुतळा, दावत चौक, अशोक चौक अशा महत्त्वाच्या चौकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत ही जनजागृती केली जाणार आहे. पोलिस आयुक्त, उपायुक्त देखील या मोहिमेत सहभागी होत आहेत. सोलापूर शहर पोलिसांच्या बॅण्ड पथकानेही मोठे योगदान दिले आहे.

‘या’ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाच...

  • डिजिटल ॲरेस्ट ही संकल्पना पोलिसांमध्ये नाही, तसे कोणी सांगत असल्यास जवळच्या पोलिसांना माहिती द्या

  • शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास लगेचच जादा नफा मिळेल अशा अनोळखी लिंकवरील मेसेजला बळी पडू नका

  • लोन ॲपमधून लगेचच कर्ज मिळेल, अशा अनोळखी लिंक, फोनला प्रतिसाद देऊ नका

  • ‘जीवनसाथी’सारख्या बनावट ॲपमधूनही अविवाहितांची फसवणूक होऊ शकते, त्याबद्दल जागरूक राहावे

  • ‘एपीके’ ॲपला बळी पडू नका; शासकीय योजनांचा लाभ देतो म्हणून किंवा ट्राफिक चालान, लाईटबिल भरा म्हणून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com