

Sardar Vallabhbhai Patel — the Iron Man who liberated Marathwada from the Nizam’s rule through Operation Polo in 1948.
Sakal
सोलापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळेच निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला. आजारी असतानाही सरदार पटेल यांनी ग्लानीतून शुद्धीवर येताच हैदराबादचे काय झाले, असा प्रश्न केला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या चरित्राचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी पटेल यांच्या चरित्रातील अनेक पैलू सांगितले.