esakal | सोलापुरात एकूण टेस्टिंगमध्ये 8.2 टक्‍के पॉझिटिव्ह ! आज 1461 रुग्ण; 32 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

बार्शी तालुक्‍यात आढळले नवीन सहा रुग्ण; एकूण संख्या 12 
सोलापुरात एकूण टेस्टिंगमध्ये 8.2 टक्‍के पॉझिटिव्ह ! आज 1461 रुग्ण; 32 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाने सोलापुरात प्रवेश करून वर्षपूर्ती नुकतीच झाली असून, आता दुसरी लाट सुसाट आहे. शहर-जिल्ह्यातील एकूण 43 लाख लोकसंख्येपैकी दहा लाख चार हजार 775 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. एकूण टेस्टिंगमध्ये आतापर्यंत 8.2 टक्‍क्‍यांच्या सरासरीने 82 हजार 462 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन हजार 366 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज शहर-जिल्ह्यात एक हजार 461 रुग्ण वाढले असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील विजयपूर रोडवरील आदित्य नगर परिसरातील 30 वर्षीय तरुणाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सोमवारी (ता. 19) याच परिसरातील 46 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला होता. आज शहरात 370 जण बाधित आढळले असून त्यातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीणमधील एक हजार 91 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 18 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट तरुणांच्या जीवावर बेतत असल्याची स्थिती समोर येऊ लागली आहे.

तील विजयपूर रोडवरील आदित्य नगर परिसरातील 30 वर्षीय तरुणाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सोमवारी (ता. 19) याच परिसरातील 46 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला होता. आज शहरात 370 जण बाधित आढळले असून त्यातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ग्रामीणमधील एक हजार 91 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 18 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट तरुणांच्या जीवावर बेतत असल्याची स्थिती समोर येऊ लागली आहे.

हेही वाचा: कडक लॉकडाउनमध्येही दुकाने राहणार का सुरू? 1 मेपर्यंत उघडण्याचे नवे आदेश

आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 15, बार्शीत 126, करमाळ्यात 117, माढ्यात 198, माळशिरसमध्ये 187, मंगळवेढ्यात 86, मोहोळ तालुक्‍यात 93, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 29, पंढरपूर तालुक्‍यात 174, सांगोल्यात 38 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 28 रुग्ण आढळले आहेत. तर करमाळ्यात सर्वाधिक पाच तर उत्तर सोलापूर तालुक्‍यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ठळक बाबी...

  • शहरातील दोन लाख 57 हजार 851 संशयितांची झाली कोरोना टेस्ट

  • आतापर्यंत शहरात आढळले 22 हजार 352 रुग्ण; 933 जणांचा कोरोनाने घेतला बळी

  • शहरातील एकूण 17 हजार 846 रुग्ण झाले बरे; सध्या तीन हजार 573 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

  • ग्रामीणमधील सात लाख 46 हजार 924 संशयितांची झाली कोरोना टेस्ट; आतापर्यंत 60 हजार 110 जण पॉझिटिव्ह

  • ग्रामीणमधील 50 हजार 922 रुग्णांची कोरोनावर मात; सात हजार 755 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

  • आतापर्यंत ग्रामीणमधील एक हजार 433 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी