Solapur Municipal Corporation
Sakal
सोलापूर
Solapur Municipal Corporation: 'सोलापूर मनपाच्या १०२ जागांसाठी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत'; राज्य निवडणूक आयोगाने काढले आदेश
State Election Commission Issues Order: आरक्षण सोडतीची जाहीर सूचना ८ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ११ नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल. आरक्षण सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल.
सोलापूर: सोलापूर महापालिकेतील २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. या संबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले असून, महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

