Magh Yatra
Magh Yatrasakal

Magh Yatra : परिवार देवता मंदिरांचा जीर्णोद्धार लवकरच सुरू ; श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

माघ यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधा, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन व जिर्णोद्वार, शहरातील २४ परिवार देवतांच्या विकास कामांच्या संदर्भातील नियोजन आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या विषयीचे महत्त्वपूर्ण निर्णय मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आले

पंढरपूर : माघ यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधा, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन व जिर्णोद्वार, शहरातील २४ परिवार देवतांच्या विकास कामांच्या संदर्भातील नियोजन आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या विषयीचे महत्त्वपूर्ण निर्णय मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आले, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

येथील भक्त निवासमध्ये आज श्री. औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत माघ यात्रेत भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविणे, चांगली स्वच्छता व्यवस्था, अन्नदान, आरोग्य व्यवस्था व इतर अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

पंढरपूर शहर व परिसरातील २४ परिवार देवतांच्या मंदिराचे संवर्धन व जिर्णोद्वार आराखडा तयार करून पुरातत्व विभागा मार्फत ई निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये मे.सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा.लि., मुंबई यांची १२ कोटी ८४ लाख ८९ हजार रुपयांची ई निविदा मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये एकविरादेवी, खंडोबा, सोमेश्वर, रिध्दि सिध्दी, लक्ष्मण पाटील, विष्णूपद, नारदमुनी, लखूबाई, अंबाबाई, व्यास नारायण, पद्मावती, यमाई तुकाई, त्र्यंबकेश्वर, काळभैरव नवग्रह, शाकंभरीदेवी, नरसोबा, मारूतीचा पार, काळा मारूती, यल्लमादेवी, रामबागचा मारूती, तांबडा मारूती, रोकडोबा, सटवाई इत्यादी देवतांच्या मंदिराचा समावेश आहे. या मंदिरांच्या विकासात्मक कामाचा लवकरच शुभारंभ करण्याचे ठरवण्यात आले.

Magh Yatra
Solapur : माळशिरस तालुक्यातून अरुण थिटे ईश्वर चिठ्ठीत विजयी ; लेबर फेडरेशन निवडणूक निकाल

माघ एकादशीला श्री विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची नित्यपुजा अनुक्रमे सदस्य ज्ञानेश्र्वर देशमुख जळगावकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान आज श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांसाठी पत्राशेड येथे अन्नछत्राचा शुभारंभ श्री.औसेकर महाराज यांच्या हस्ते आणि सदस्यांचे उपस्थितीत करण्यात आला. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), प्रकाश जवंजाळ हे समक्ष तर, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, अतुलशास्त्री भगरे गुरूजी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सर्व खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

नूतन तहसीलदारांचा सत्कार

पंढरपूरचे नूतन तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत जाधव, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, मंदिर शाखा पोलिस निरीक्षक महेश ढवण यांच्याशी यात्रेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली व श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नेमणूक झाल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com