
मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मंगळवेढा तालुक्याचा निकाल 97.29 टक्के लागला असून, अपूर्व काटकर याने 93 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम आला आहे. पाच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अकाउंटन्सी विषयात इंग्लिश स्कूलचा मनोज म्हमाणे याने 100 पैकी 100 गुण मिळवून बोर्डात प्रथम आला.
तालुक्याच्या निकालामध्ये शहरातील इंग्लिश स्कूल व दामाजी महाविद्यालयाचा दबदबा राहिला. तालुक्यातून 2753 विद्यार्थ्यानी या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामध्ये 2740 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 230 विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर 1506 प्रथम श्रेणीत, 906 द्वितीय श्रेणीत तर 74 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. शास्त्र विभागात दामाजी महाविद्यालयाची स्नेहल मासाळ 89.23 गुण घेऊन तालुक्यात प्रथम तर कला विभागात दामाजी महाविद्यालयाचा स्वप्नील सरवदे 84 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला. वाणिज्य विभागात इंग्लिश स्कूल मंगळवेढ्याची राधिका भगत 86.92 प्रथम तर व्यावसायिक विभागात इंग्लिश स्कूलची पूजा मेटकरी 78.92 गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. तालुक्यातील एकूण निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून दुपारी एकपासून विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली होती. निकालानंतर कोरोनाच्या संकटामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपला जल्लोष किंवा आनंद साजरा करता आला नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत आनंद साजरा करावा लागला.
शाळानिहाय निकालामध्ये तालुक्यामध्ये इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज (97.94 टक्के), श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा (98.17), विद्यामंदिर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सलगर बु (99.23), पोस्ट बेसिक आश्रमशाळा, बालाजीनगर (96.77), आंधळगाव प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय (95.23), इंग्लिश स्कूल, भोसे (92.63), माध्यमिक आश्रमशाळा व ज्यु. कॉलेज (95.74) एम. पी. मानसिंगका विद्यालय व ज्यु. कॉलेज (99.13), माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, बालाजीनगर (99.25), स्वामी विवेकानंद विद्यालय व ज्यु. कॉलेज (92.50), विठ्ठलराव नारायण येलपले ज्यु. कॉलेज, येड्राव, खवे (96.71), महासिद्ध विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज (95.23), शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज, पाटखळ (97.87), कर्मयोगी श्री. ह. रा. कवचाळे ज्यु. कॉलेज, बोराळे (92.59), माध्यमिक व ज्यु. कॉलेज, अरळी (90.76), इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेज, मंगळवेढा (98.80).
यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, विद्या विकास मंडळाचे राहुल शहा, शिक्षण प्रसारक मंडळाचे सुजित कदम, सभापती प्रेरणा मासाळ, माळी नगराध्यक्ष अरुणा माळी, पक्षनेते अजित जगताप, प्रदीप खांडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
भर टक्के निकालाच्या पाच शाळा
बाळकृष्ण विद्यालय व ज्यु. कॉलेज, नंदेश्वर, प्रथमेश इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यु. कॉलेज, हनुमान विद्यामंदिर व कला व शास्त्र महाविद्यालय, मरवडे, सिद्धनाथ विद्यालय व ज्यु. कॉलेज, लेंडवे चिंचाळे, शरदनगर ज्यु. कॉलेज, शरदनगर-मल्लेवाडी.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.