

सोलापूर: बदलीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र पाठवत त्या ४३ शिक्षकांच्या आजार, दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्यास आदेश काढले, त्या आदेशास २३ दिवस उलटले असून किती शिक्षकांची फेरतपासणी झाली याबाबत शिक्षण विभागाकडेच कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.