Solapur Accident: 'माळशिरस येथे कारची दुचाकीला धडक; पाचवर्षीय बालकाचा मृत्यू', जाेराची धडकेत बालक उंच उडून रस्त्यावर पडलं अन्..
Fatal Crash in Malshiras: माळशिरस येथील यादव पेट्रोल पंपानजीक बाळाला तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. नंतर ते निघाल्यानंतर काही अंतरावर आले असता, नातेपुतेकडून माळशिरसकडे येणाऱ्या भरधाव कारने (एमएच १२- एफपी ९४२९) दुचाकीला जोरदार धडक दिली.
माळशिरस : भरधाव कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील पाच वर्षाचा चिमुकला उडून रस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आजी गंभीर जखमी झाली.