
सोलापूर : उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.१७) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात ‘उद्योगवर्धिनी परिवार उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सरसंघचालक हे उद्योगवर्धिनी केंद्राला भेट देऊन कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी दिली.