
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आधुनिक भारताच्या पुनरुत्थानाचे आंदोलन आहे. या आंदोलनात देशातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. संघाच्या शाखेतून देशभक्त तयार करण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्राचे सहकार्यवाह यशवंतभाई चौधरी यांनी केले. हरीभाई देवकरण प्रशालेच्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.