

Rural Girl Kalyani Shinde Becomes Pilot, Parents Celebrate Her Incredible Achievement
Sakal
नातेपुते : शिंदेवाडी, (ता. माळशिरस) सारख्या छोट्या गावातून मोठी स्वप्ने पाहणे व ती पूर्ण करणे, हे फार कमी लोक करू शकतात. याच स्वप्नांना सत्यात उतरवून कल्याणीने वडील नानासाहेब शिंदे व आई रेखा यांच्यासह गावाचेच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे नाव उंच केले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन, कल्याणीने व्यावसायिक वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे