Solapur Loksabha : मंगळवेढ्यातील दुष्काळी कलंक घालवायचा असेल तर सिंचन योजना राबवणे गरजेचे ; सातपुते

मंगळवेढा तालुक्याला दुष्काळाचा कलंक लागला असला तरी मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबवून हा कलंक आ. समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्याला खांदा लावून पुसला जाईल अशी ग्वाही लोकसभेची भाजपा उमेदवार आ. राम सातपुते यांनी लक्ष्मी दहीवडी येथे बोलताना व्यक्त केले.
Solapur Loksabha
Solapur Loksabhasakal

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्याला दुष्काळाचा कलंक लागला असला तरी मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबवून हा कलंक आ. समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्याला खांदा लावून पुसला जाईल अशी ग्वाही लोकसभेची भाजपा उमेदवार आ. राम सातपुते यांनी लक्ष्मी दहीवडी येथे बोलताना व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घरनिकी, मारापुर, गुंजेगाव,ममदाबाद शे. लक्ष्मी दहिवडी या गावाचा दौरा केला. त्या दौऱ्यात ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत आ. समाधान आवताडे,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , विधानसभा प्रमुख राजेंद्र सुरवसे , जिल्हा नियोजन सदस्य प्रदीप खांडेकर , सुरेश भाकरे , भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन यादव , संजय पवार , अविनाश मोरे , सरपंच विनायक यादव , उपसरपंच अशोक आसबे , चेअरमन राजकुमार यादव , रावसाहेब चौगुले , रावसाहेब मेटकरी , अंकुश मेटकरी , राजू कुलकर्णी , मल्लिकार्जुन पाटील , विलास पाटील , दत्तात्रय नवत्रे , राजकुमार सुडके , दीपक सुडके आदी होते यावेळी बोलताना आ. सातपुते म्हणाले की

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत मोठ्या प्रमाणात प्रगतीची वाटचाल करीत असून 40 हजार कोटीचे महामार्ग या जिल्ह्यातून झाले आहेत,त्यातील काही रस्त्याची कामे सुरू आहेत तर काही रस्ते प्रस्तावि आहेत. महिलांना चुलीपासून धुर मुक्त करण्यासाठी उजाला योजनेतून जिल्ह्यात 2 लाख कुटूंबाला गॅस दिले. शौचालयासाठी स्वच्छ भारत अभियानातून शौचालय बांधून दिले आहे तर गावातील प्रत्येक लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजनेतून कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे,काॅग्रेस सरकारच्या काळात लाभार्थीला एक रुपया निधी दिला की खाली 15 पैसे यायचे परंतु पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातून शेतकऱ्याच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये सोडले जातात आणि तितकेच खात्यावर जमा होतात

.काॅग्रेसने सत्तेतून पैसा पैशातून सत्तेचे काम केले.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विकासाची गंगा गावात,वाडी वस्तीवर नेण्याचे काम केले पूर्वीच्या काळी अतिरेकी भारतात येऊन हल्ले करायचे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अतिरेकी करावयावर प्रतिबंध केला जर एखादा अतिरेकी येऊन परत गेला तर त्याला घुसून मारण्याची भाषा केली जात आहे.

आ.समाधान आवताडे यांनी विरोधकावर खरपूस टीका करत म्हणाले विरोधक आपल्या तालुक्यात येऊन म्हणत आहेत की माझ्या दबावामुळे पाणी आलं उद्या ते म्हणतील की माझ्या दबावामुळे चंद्रयान वरती गेलं माझ्या दबावामुळेच सर्व देश चालत आहे असं बोललं तर तुम्ही वावग वाटून घेऊ नका स्वतःच्या मतदारसंघांमध्ये काही काम न केलेले आज कुठेतरी माझ्या दबावामुळे हे होत आहे असं सांगण्याचा केवलवाना प्रयत्न करत आहेत .

अडीच वर्षाच्या काळामध्ये कोठावधी रुपयाचा निधी आणून प्रत्येक गावाला जे जे करता येईल ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण केलेला आहे आणि इथून पुढच्या काळात देखील तालुक्यातला गुंठाणा गुंठा सिंचनाखाली आणल्याशिवाय आपण राहणार नाही .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com