रोजंदारीवर काम करणाऱ्या सचिनची राज्य राखीव दलामध्ये झेप | Schin Manjare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin manjare
रोजंदारीवर काम करणाऱ्या सचिनची राज्य राखीव दलामध्ये झेप

रोजंदारीवर काम करणाऱ्या सचिनची राज्य राखीव दलामध्ये झेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चळे - पंढरपूर तालुक्‍यातील कोंढारकी हे साधारण १४०० लोकसंख्या असलेलं गाव. गावातील बहुसंख्य नागरिक हे बांधकाम व्यवसायकडे वळलेले. गावात शासकीय नोकरदारांची संख्या तशी नगण्यच. अशातच गावातील सचिन बाळू मांजरे या तरुणाने राज्य राखीव बल क्रमांक १ (एस.आर.पी.एफ.) मध्ये भरती होऊन त्याच्या पिढीतील पहिला सरकारी नोकरदार बनण्याचा मान मिळवला आहे.

सचिन याची कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची. दोन पत्र्यांच्या खोल्यांचे घर, आई-वडील शेतमजूर आणि स्वतः इतरांच्या शेतामध्ये कष्ट करून आपल्या ध्येयाशी ठाम तो ठाम होता. सचिनने परिस्थितीशी दोन हात करत हे यश मिळवले आहे. पोरानं आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. या प्रसंगी आईच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभे राहिले होते. सचिन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील विवेक वर्धनी विद्यालयमध्ये झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे सचिनने मिळेल ते काम करून आपले शिक्षण पूर्ण केले.

सचिनच्या या यशाबद्दल कोंढाराकी ग्रामस्थांच्या वतीने भागवत पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गणेश दांडगे, माजी अध्यक्ष हनुमंत ताटे, आयआयटी कम्प्युटरचे नितीन आसबे, सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फुगारे, ओम भोसले, सागर पाटील पांडुरंग लाटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: माळशिरसचे मुख्याधिकारी वडजे 'अँटी कनप्शन'च्या जाळ्यात! गुन्हा दाखल

सरावासाठी गावातच तयार केले मैदान

सचिन याने भरतीसाठी अकॅडमी जॉईन केली होती. परंतु, लॉकडाउनमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली. तेव्हा सचिन गावाकडे आला. गावीत आल्यावर सचिन व त्याच्या मित्रांनी गावातच दहा हजार रुपये खर्च करून मैदान तयार केले व आपला शारीरिक चाचणीचा सराव पूर्ण केला.

ग्रामीण भागातील मुलांनी आपल्या ध्येयावर ठाम राहून कष्ट करण्याची तयारी ठेवली. येणाऱ्या परिस्थितीला नेटाने सामोरे गेले तर यश नक्की मिळते.

- सचिन मांजरे

हलाखीच्या परिस्थिती सचिनचे यश पाहून आनंद होतो आहे. मुलाने आमच्या कष्टाचे चीज केले, याचे समाधान आहे.

- नंदा मांजरे, सचिनच्या आई

loading image
go to top