
Sakal Relief Fund Reaches Ghatane; Lifeline for Sina River Flood-Affected Villagers
Sakal
मोहोळ : पूरग्रस्त घाटणे गावातील ११२ कुटुंबांना ‘सकाळ रिलीफ फंडा’तून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. मोहोळपासून ६ किलोमीटरवर सीनेकाठी घाटणे हे १५०० लोकवस्तीचे गाव आहे. सीना नदीच्या प्रलयकारी महापुराने हे गाव अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. महापुराचे पाणी शिरल्याने नदी काठावरील पिके पूर्णपणे वाया गेली असून, चार दिवस गावाचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता. ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर, शाळेसह अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या महापुरामध्ये अनेकांचे क्षणात होत्याचे नव्हते झाले.