जेऊर येथे किराणा दुकानातून भेसळयुक्त पदार्थांची विक्री

दिवाळी सणाच्या तोंडावर जेऊर व परिसरातील ग्राहकांना येथील एस. कुमार किराणा दुकानातील भेसळयुक्त माल विक्री होत असल्याची तक्रार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Grocery Shop
Grocery ShopSakal

करमाळा (सोलापूर) - जेऊर (ता. करमाळा) येथे दिवाळी दस-याच्या तोंडावर येथील एस. कुमार ट्रेडर्स या किराणा दुकानात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पदार्थांची विक्री सुरू असुन, याबाबत ग्राहकांनी विचारणा केली असता येथील दुकानदार हे ग्राहकांना उद्धट भाषेत शिवीगाळ करत आम्हाला दुकान चालण्याची गरज नाही, आमचे पटत नसले तर आमच्या दुकानात येत जाऊ नका, म्हणून दमबाजी करत आहेत. भगरीचे पिठ, बेसन, गरा, मैदा व इतर पदार्थ मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची तक्रार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केली आहे.

दिवाळी सणाच्या तोंडावर जेऊर व परिसरातील ग्राहकांना येथील एस. कुमार किराणा दुकानातील भेसळयुक्त माल विक्री होत असल्याची तक्रार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जेऊर पेठतील मेन रोडवर हे दुकान असुन या दुकानातील मालाविषयी ग्राहकांच्या कायम तक्रारी येत आहेत. कोणत्याही वस्तूचे वजन व्यवस्थित न देणे, मालावर चुकीच्या किंमती चिटकवणे, भेसळयुक्त माल देणे, घेतलेल्या मालाची पावती न देणे, हे प्रकार वारंवार होत आहेत. सध्या सणासुदीच्या तोंडावर ग्राहक मैदा, गरा, खोबरे, हळद, खारीक व इतर दिवाळीच्या सणासाठीचे वस्तु खरेदी करत आहेत. हे पदार्थ एस. कुमार ट्रेडर्स मधुन भेसळयुक्त विकले जात आहेत. नवराञीच्या उपवासासाठी मोठ्या प्रमाणात भगरीचे पिठ येथे विकले जात असल्याचीही तक्रार झाली आहे. यात भेसळ होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांच्याकडे करण्यात आली आहे.

Grocery Shop
पंढरपूर : मनसेची पहिली ऊस परिषद मराठवाडयात

यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासनाचे यांनी दिले आहे. जेऊर हे तालुक्यातील करमाळा शहरापाठोपाठ महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. या भागातील वांगी, चिखलठाण, शेटफळ, कोंढेज, कुंभेज, जेऊरवाडी, केडगांव, कुगांव या भागातील ग्राहकांसाठी ही मूख्य बाजारपेठ आहे. जेऊर बाजारपेठ हा प्रकार घडत असल्याने या भागातील नागरिकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत असून एस. कुमार टेडर्स या किराणा दुकानाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

यावर अन्न व औषध प्रशासन नेमकी काय भुमीका घेणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

जेऊर व परिसरातील अनेक ग्राहकांनी जनशक्ती संघटनेकडे एस. कुमार ॲन्ड कंटनी या किराणा दुकानाविषयी तक्रारी आल्या आहेत. अन्न व प्रशासन विभाग सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांच्याशी बोलणे ही झाले आहे. लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन अन्न व प्रशासन अधिकारी श्रीमती हिरेमठ यांनी दिले आहे.

- अतुल खुपसे, अध्यक्ष, जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य.

जेऊर येथील एस. कुमार किराणा दुकान संदर्भात आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीची दखल घेऊन तात्काळ संबंधित दुकानांची तपासणी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

- नंदिनी हिरेमठ, अन्न व प्रशासन अधिकारी सोलापूर.

आमच्या दुकानात कोणत्याही मालात भेसळ होत नाही. कोणीतरी जणूनभूजून ही तक्रार केलेली आहे. आम्ही आता जेउरमध्ये मॉलही सुरू करत आहोत. दिवाळीच्या तोंडावर आम्ही सर्व फ्रेश माल भरलेला आहे.

- सुयोग दोशी, एस. कुमार ट्रेडर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com