चोरांकडून सात लाखांच्या 14 मोटारसायकली जप्त! सांगोला पोलिसांची कामगिरी | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरांकडून सात लाखांच्या 14 मोटारसायकली जप्त! सांगोला पोलिसांची कामगिरी
चोरांकडून सात लाखांच्या 14 मोटारसायकली जप्त! सांगोला पोलिसांची कामगिरी

चोरांकडून 7 लाखांच्या मोटारसायकली जप्त! सांगोला पोलिसांची कामगिरी

सांगोला (सोलापूर) : सांगोला पोलिसांनी (Sangola Police) मोटारसायकल चोरांविरोधात मोठी कारवाई करून दोन मोटारसायकल चोरांकडून सात लाख 15 हजार रुपये किमतीच्या 14 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सत्यवान बजरंग इंगवले (रा. मेडशिंगी, ता. सांगोला) व रोहन मारुती गायकवाड (रा मांजरी (बु.), हडपसर, पुणे) (Pune) या दोन मोटारसायकल चोरांना सांगोला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा: एसटी महामंडळ 'या'मुळे खड्ड्यात! 700 बस खरेदीची निविदा

वाढेगाव (ता. सांगोला) येथील रजनीकांत सूर्यगंध यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल सांगोला येथून चोरी झाल्याचा गुन्हा सांगोला पोलिसात नोंदवला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगानेच व पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सत्यवान बजरंग इंगोले (रा. मेडशिंगी, ता. सांगोला) हा मोटारसायकल चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी मेडशिंगी येथे जाऊन शोध घेतला. पोलिसांना त्याच्या घराशेजारी असलेल्या शेतीच्या बांधालगत अनेक मोटारसायकली लावलेल्या आढळल्या. याबाबत पोलिसांनी अधिक तपास करून त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या 14 मोटारसायकली जप्त केल्या. त्याला मोटारसायकल चोरण्यासाठी मित्र रोहन मारुती गायकवाड (रा. पुणे) हाही मदत करत असून, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोरोना अंगावर काढू नका! 23 वर्षीय तरुणीची नऊ दिवसांची झुंज संपली

या गुन्ह्यात एकूण सात लाख 15 हजार रुपयांच्या 14 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन वाघ, काझी, कोरे, हेंबाडे, पाटील व सायबर पोलिस ठाण्याचे अन्वर आत्तार यांनी केली. या दोघांनी पंढरपूर, सांगोला व पुणे परिसरातून मोटारसायकली चोरी केल्या आहेत. ज्यांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत त्यांनी सांगोला पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहनही पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे.

loading image
go to top