Sangola police seize illegal sand materials worth ₹3.07 lakh during crackdown on unauthorized transport.
esakal
सांगोला: सांगोला पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करून सुमारे तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास वाघमोडे वस्ती, सावे (ता. सांगोला) परिसरात करण्यात आली.