Bribery Casesakal
सोलापूर
Bribery Action:'भूमिअभिलेखचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात'; सांगाेला तालुक्यात खळबळ, विहीर नोंदीसाठी मागितले १० हजार
तक्रारदाराच्या पोटहिश्यातील विहीर व बोरवेलची नोंद लावण्यासाठी आकारफोड बाबत दक्षिण सोलापूरच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास अर्ज केला होता. ते काम करून साहेबांची स्वाक्षरी घेऊन तहसिल कार्यालयास पाठविण्यासाठी संशयित आरोपीने दहा हजार रुपयांची लाच मागितली.
सोलापूर: विहीर, बोअरवेल नोंदीसाठी लाच मागणारा भूमिअभिलेखचा लिपिक शंकर अरुण बजबळकर (वय ३०, रा. तिप्पेहळळी, ता. सांगोला) आणि रिक्षा चालक सूरज रवींद्र सर्वगोड (रा. हौसेवस्ती, मरिआई चौक, देगाव रोड, सोलापूर) यांच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.