esakal | भारतीय सैन्य दलात एकाच गावातील एकावेळी दोन भावडांसह सात जणांची निवड

बोलून बातमी शोधा

At Sapatne from Seven of the selected in the military

ग्रामीण भागात असलेल्या या युवकांनी आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. आम्ही काॅलेजच्या एनसीसीच्या माध्यामातुन त्यांना चांगले मैदान उपलब्ध करून दिले आहे.भविष्यात देखील अशीच बरीच मुले या परिसरातील भरती होतील अशी खात्री वाटते. 
- डॉ. सुरेश ढेरे,
प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय माढा

भारतीय सैन्य दलात एकाच गावातील एकावेळी दोन भावडांसह सात जणांची निवड
sakal_logo
By
अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : 'हातावर पोट' घेऊन जगणं वाट्याला आलेल्या आणि घरात अठाराविश्व दारिद्र्याची परिस्थिती अशा या परिस्थितीत दुर्दम इच्छाशक्तीच्या जोरावर माढा तालुक्यातील सापटणे येथील दोन सख्या भावांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. तोहिद शमीन काझी व तौफिक शमीन काझी असे त्या युवकांचे नाव.
घरची परिस्थिती अत्यंत बिकट, ३० गुंठा जमीन, त्यामध्ये व इतर शेतात कामाला जाऊन आईवडील संसाराचा गाडा हाकतात. अशा परिस्थिती मुलांच्या शिक्षणास पै-पै जमा करून पैसे पुरवतात. तोहिद व तौफीक या दोघांनाही घरची परिस्थितीची जाण असल्याने हि परिस्थिती बदलली पाहिजे, अशी मनाशी खुणगाठ त्यांनी बांधलेली. त्यात दोघांनाही लहानपणापासून सैन्य दलाचे आकर्षण असल्याने आपण देशाच्या सेवेसाठी सैन्यात रूजू होऊन देशसेवा करायची, अशी दोघांची प्रबळ इच्छा. देशसेवेसेठी मुल सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहात असल्याने आई-वडिलांनी देखील सतत त्यांना प्रोत्साहन दिले. कधीही कुठल्याही गोष्टीची गरज त्यांना भासु दिली नाही. आई- वडिलांच्या कष्टाची जाण ठेवुन या दोघांनी या क्षेत्रातच आपले करिअर घडवयाचे या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या स्वप्नांना आधार मिळाला तो माढयाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात. येथे शिक्षण घेत असताना त्या दोघांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे व एनसीसी विभागाचे प्रमुख नवनाथ लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसीच्या माध्यामातुन सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रयत्न सुरू केले.
अन् अखेर जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर सैन्य दलाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करत स्वप्न साकार केले. त्यांच्या बरोबर याच गावातील चेतन दशरथ पाटील व रोहित भैरू गायकवाड हेही सैन्य दलात भरती झाल्याने गावातील नागरिकांकडुन कौतुक होत आहे. तसेच माढा शहरातील अक्षय औदुंबर कदम, जीवन महादेव गोसावी व अनिकेत अर्जुन सुरवसे यांचीही निवड झालेली आहे. विशेष म्हणजे यातील काही युवकांनी कुठेही कोणत्याही अॅकडमीत न जाता स्वतःच्या हिमतीवर व कष्टाने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागात असलेल्या या युवकांनी आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. आम्ही काॅलेजच्या एनसीसीच्या माध्यामातुन त्यांना चांगले मैदान उपलब्ध करून दिले आहे.भविष्यात देखील अशीच बरीच मुले या परिसरातील भरती होतील अशी खात्री वाटते. 
- डॉ. सुरेश ढेरे,
प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय माढा