MLA Samadhan Autade : दोन जिल्ह्याची कुस्ती आमच्यावर आमच्या अंगावर आ. आवताडे

कृष्णा-कोयना खोऱ्यातील पाणी वाटपावरून सांगली व सातारा या दोन जिल्ह्यात लागलेली कुस्ती आमच्यावर आमच्या सोलापूर जिल्ह्य़ाच्या अंगावर.
mla samadhan autade
mla samadhan autadesakal

मंगळवेढा - कृष्णा-कोयना खोऱ्यातील पाणी वाटपावरून सांगली व सातारा या दोन जिल्ह्यात लागलेली कुस्ती आमच्यावर आमच्या सोलापूर जिल्ह्य़ाच्या अंगावर येत असून ती येऊ नये म्हणून म्हैसाळ योजनेचे पाणी टेल टू हेड याप्रमाणे द्यावे अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना केली.

हिवाळी अधिवेशनात कोयनेच्या पाणी वाटपावरून आ. जयंत पाटील, आ. विश्वजीत कदम, आ.समाधान आवताडे, आ. विक्रम सावंत यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये बोलताना आ. आवताडे म्हणाले की, कृष्णा कोयनेच्या पाणी वाटपात सांगोला व मंगळवेढा हे दोन तालुके शेवटच्या टोकाला येत असल्यामुळे दोन जिल्ह्यात लागलेल्या कुस्तीमुळे त्यांना पाणी मिळत नाही.

पाणी वाटप करताना टेल टू एंड याप्रमाणे वाटप करण्याची मागणी करत जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रयत्नान म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, या १८ गावांना या गावांना लाभ झाला.

गेल्या काही दिवसांपूर्वी म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आ.आवताडे यांनी म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत वरील भागांना ज्या पद्धतीने पाणी मिळते त्याच पद्धतीने म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक -२ मधून पूर्ण दाबाने पाणी देण्यात यावे त्याचबरोबर वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी करण्यात यावे अशी मागणी केली.

या मागणीची दखल घेऊन टेल टू हेड अंतर्गत तालुक्यातील विविध गावांना या पाण्याची वितरीत करण्याचे आदेश दिले. अगोदरच दुष्काळाचा कलंक असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे पाणी तालुक्याला मिळणे अतिशय गरजेचे असल्याचेही आ.अवताडे यांनी आज सांगितले.

त्यावर बोलताना जलसंपदा मंत्री फडणवीस म्हणाले की, दोन जिल्ह्यात लागलेल्या कुस्तीत सोलापूर जिल्ह्याचे नुकसान होणार नाही किंबहुना ही कुस्ती लागूच नये यासाठी प्रयत्न करणार आहे. या तिघांनी एकत्रितपणे नीट नांदावे अशा पद्दतीने प्रयत्न करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com