.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश पारित होऊनही नऊ महिन्यांपासून राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ शिक्षक समन्वय संघाचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. १८ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्याने संघाने आठ व नऊ जुलै रोजी राज्यव्यापी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.