बियाणांची नासाडी टळणार ! 'श्री सिध्देश्‍वर'ची चिमुकली बनविणार "आधुनिक पेरणी मशीन'

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी श्री सिद्धेश्‍वर बालमंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली
Shri Siddheshwar students
Shri Siddheshwar studentssakal
Updated on

सोलापूर : केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी श्री सिद्धेश्‍वर बालमंदिर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.विज्ञान प्रदर्शन महाराष्ट्र राज्य विज्ञान संस्था नागपूर यांच्यामार्फत घेतले जाते. प्रशालेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पवन यशवंत सिंदगी या विद्यार्थ्याने पेरणी करताना बळीराजाच्या बियाणांची बचत व्हावी म्हणून "आधुनिक पेरणी मशीन' तयार करण्याची संकल्पना सुचविली. त्या उपकरणाची निवड या प्रदर्शनात झाली असून शासनाकडून त्या यशस्वी विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. (Modern sowing machine)

Shri Siddheshwar students
कोल्हापूर : पावणे चारशे 'पोलिसांना' मिळणार बढती

ते उपकरण तयार करण्यासाठी श्रेयश स्वामी व आर्यन ढावणे हे दोघे विद्यार्थी त्याला मदत करणार आहेत. शाळेतील विज्ञान शिक्षिका सरस्वती बताले यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण बनविण्यात येणार आहे. श्री सिध्देश्‍वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, शिक्षण समिती ज्येष्ठ सदस्य व्ही. बी. बऱ्हाणपूरे, भिमाशंकर पटणे, मल्लिकार्जून कळके, गुरुराज माळगे, डॉ. राजशेखर येळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा, समन्वयक संतोष पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमनी यांनी त्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यापूर्वीही श्री सिध्देश्‍वर बालमंदिर प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी बेशिस्त वाहतूक, शहरातील कचरा, पर्यावरण यासह विविध विषयांवर ठिकठिकाणी जनजागृतीचे उपक्रम राबविले आहेत.(Awareness activities have been carried out on various topics including environment)

Shri Siddheshwar students
नाशिक : ऑनलाइन गंडविलेले ४० हजार परत

अशी सूचली संकल्पना...

पवन सिंदगी याचे वडील शेती करतात. ते प्रयोगशील शेतकरी असून पेरणीवेळी होणारी पंचाईत पवनने स्वत: पाहिली होती. पारंपारिक पध्दतीने पेरणी केल्यानंतर अनेकदा एकाच ठिकाणी जास्त बियाणे पडतात, बियाणे वाया जातात. त्यामुळे बियाणांचा खर्चही वाढतो आणि उत्पादनावर परिणाम होतो. वडिलांकडून त्याबद्दल पवनला माहिती मिळाली. त्यानंतर सहावीतील पवनने त्यावर उपाय शोधण्याचे ठरवले आणि आधुनिक पेरणी मशीन तयार करण्याचा निश्‍चय त्याने प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता चिकमनी व विज्ञान शिक्षका सरस्वती बताले यांना सांगितला. त्या मशिनमुळे एका ठिकाणी दोन बिया पडणार असून त्यामुळे बियाणे वाया जाणार नाहीत व उत्पादनही चांगले येईल, असा पवनला विश्‍वास आहे. त्याची संकल्पना आता सत्यात उतरविण्यासाठी त्याने मशिन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.