Solapur Sina River: 'सीना नदीचे रौद्ररूप; दहा गावांचा संपर्क तुटला'; वीस गावात पुराचे पाणी

Sena River Flood 2025: सीना नदीच्या पुराचा अंदाज बांधणे कोणालाही शक्य झाले नाही. राहुलनगर, वाकाव, लोणी, लहू, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, म्हैसगाव, पापनस, रिधोरे, तांदूळवाडी, निमगाव (मा.), महातपूर, दारफळ, राहूलनगर, खैराव, केवड, उंदरगाव, वाकाव, कुंभेज या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
Solapur Heavy Rain

Solapur Heavy Rain

Sakal

Updated on

-किरण चव्हाण

माढा: माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या वीस गावांमध्ये पाणी शिरले असून किमान दहा गावांचा संपर्क तुटलेला आहे सीना नदीने रौद्ररूप धारण केले असून सीना नदीकाठी भयावह परिस्थिती आहे. हजारो लोक सीना नदीच्या पुरामध्ये अडकून पडले असून अग्निशामक दलाच्या तुकडीकडून बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. प्रशासन, ग्रामस्थ पुरापुढे हतबल झाले असून एवढ्या मोठ्या पुराचा अंदाज कोणालाही बांधता आला नाही. सिना नदीला आलेला हा विक्रमी पूर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com