Solapur Crime: 'साेलापूर शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठाचे दागिने लंपास'; पोलिस असल्याचे सांगून फसवणूक

Fake Police Dupe Elderly Man in Solapur: २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अशोक भुजबळ सुमंत (वय ७८, रा. बालाजी हाउसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) हे मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी एक अनोळखी त्यांच्याजवळ आला. पोलिस असल्याचे सांगून जवळील ओळखपत्र त्यांना दाखविले.
Jewelry Theft
Jewelry Theftsakal
Updated on

सोलापूर: सकाळी उठून घराजवळच मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ७८ वर्षीय ज्येष्ठाचे दागिने दोन अनोळखी तरुणांनी लंपास केले आहेत. पोलिस असल्याचे सांगून त्यांच्याकडील ५० हजार रुपयांची सोन्याची चेन व २५ हजार रुपयांची अंगठी, असे ७५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com