तिसंगीत प्राथमिक शिक्षकांनी केले आगळे वेगळे पोस्टर आंदोलन 

postaer aandolan.jpg
postaer aandolan.jpg
Updated on

तिसंगी(सोलापूर)ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे वतीने प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले. 

हे आंदोलन आमदार कपिल पाटील, राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य प्रसिद्धी प्रमुख पप्पू मुलाणी, जिल्हाध्यक्ष अरून नागणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षकांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

यावेळी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करावी. जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात यावा. 
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द करण्यात यावी. या मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले. या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी घरात राहून पोस्टर आंदोलन केले. आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. 
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय हेगडे, उपाध्यक्ष बिरूदेव देवळे, कार्याध्यक्ष बापू चव्हाण, सरचिटणीस सदाशिव माने, धनाची बोबडे, अंजु करळे, मंदा खरात, अरूण गायकवाड, संतोष देगावकर, धनाजी जाधव, रामचंद्र बेलकर, महिला प्रतिनीधी वैशाली साळुंखे, जयश्री दानोळे, उषा गणपाटील आदीसह हजारो शिक्षक सहभागी झाले होते. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com