Solapur : सोलापूर मंगळवेढा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच ; पिकअपच्या धडकेत परप्रांतीय मजूर ठार

सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पायी चाललेल्या परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला.
Solapur
Solapursakal

बातमीदार : अश्पाक बागवान

बेगमपूर : सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पायी चाललेल्या परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला.ही घटना सोलापूर मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरील बेगमपूर(ता.मोहोळ) गावाजवळ काल बुधवारी रात्री आठ वाजणेचे सुमारास घडली.

शामसुंदर रामराज चौहान (वय३५,रा.हरय्या,जिल्हा बस्ती-उत्तरप्रदेश)असे अपघातातील मृत मजुराचे नाव आहे.घटनेनंतर पिकअप चालकाने कांही अंतरावरील महामार्गालगतच्या एका शेतात वाहन थांबविले व तेथून स्वतःचा बचाव करीत पळून गेला . संबधित शेतकऱ्याने आपल्या शेतात संशयितरित्या गाई व वासरांसह उभारलेल्या सदर वाहनाची पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी जनावरांसह वाहन ताब्यात घेतले.

याबाबत मिळालेली माहिती अशी : सध्या बेगमपूर येथेच राहत असलेला शामसुंदर चौहान हा उत्तरप्रदेशातील आपल्या सहकाऱ्यांबरोबर मागील काही महिन्यांपासून बेगमपूर भागात बांधकाम व फरशी बसविण्याची कामे करीत होता. महामार्गालगत असलेल्या स्टेट बँकेसमोरील एका खानावळीतून जेवनाचा डबा घेवून जवळच भाड्याने राहत असलेल्या घराकडे निघाला. याचवेळी मंगळवेढ्याच्या दिशेने सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या एम एच ०३/६२०३ या क्रमांकाच्या जनावरे घेवून निघालेल्या पिकअपने त्याला जोरदार धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळला. डोक्याला जबर मार लागल्याने टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

तत्पुर्वी त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले.दरम्यान मागील अनेक वर्षापासून महामार्गावरील अनेक असुविधा व घटनेचे गांभीर्य न घेता अपघातानंतर पिकअप चालक वाहन न थांबवताच भरधाव वेगाने वाहनासह निघून गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली.यावेळी कामती पोलिसांनी मध्यस्थी करीत रस्त्याबाबतच्या समस्येवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवत शांततेत माघार घेतली .

Solapur
Solapur News : भोसे योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई आराखडयामधून मधून 29 लाख मंजूर - समाधान आवताडे

दरम्यान अपघातानंतर चालकाने सदरचे वाहन महामार्गालगत असलेल्या प्रकाश भालेराव या शेतकऱ्याच्या शेतात उभे करून करून पळ काढला.सदर शेतकऱ्यांने आपल्या शेतात जनावरांसह संशयास्पद उभ्या असलेल्या पिकअप वाहनाची कामती पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ जनावरांसह वाहन ताब्यात घेतले.वाहनातील जनावरे मोडनिंब येथील गोशाळेत पाठविली असून पळून गेलेल्या चालकाचा पोलीस तपास करीत आहेत.

सदर घटनेची नोंद सोलापुरातील शासकीय रुग्णालय पोलिसांत झाली. दरम्यान या परप्रांतीय मजुराची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्याचा मृतदेह अद्यापही शवविच्छेदन करून शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात पडून आहे. अंतिम संस्कारासाठी उत्तर प्रदेशातून नातेवाईकच अंत्यसंस्कार करण्यासाठी सोलापूरला येत असल्याची माहिती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com