Sharad Pawar drought visit relief : 'पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या' गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी! शरद पवारांनी जागेवरच सुपूर्त केला ५० लाखांचा धनादेश

Sharad Pawar 50 lakh aid for drought village : कोरड्या पडलेल्या फळबागा पाहून ज्येष्ठ नेते हेलावले; केवळ आश्वासन नाही तर थेट कृती, माढ्यातील 'त्या' गावाला मोठा दिलासा
Big relief to villagers who put up 'Village for Sale' board.

Big relief to villagers who put up 'Village for Sale' board.

Sakal

Updated on: 

तीव्र पाणीटंचाईमुळे हवालदिल होऊन "पाण्यासाठी आमचे गाव विकायला काढले आहे," असा संतप्त फलक लावून आंदोलन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी या दुष्काळग्रस्त गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी केवळ कोरडी आश्वासने न देता, तुळशी गावाच्या पाणीप्रश्नासाठी थेट ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत मदतीचा धनादेश जागेवरच सुपूर्त केला.

Loading content, please wait...