Maharashtra Kesari : मोहोळचा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याचा शरद पवार यांनी गोविंद बागेत केला सत्कार

गेल्या आठवड्यात पुण्या जवळील पुलगाव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध सिकंदर शेख अशी लढत झाली.
sharad pawar honoured mohol maharashtra kesari wrestler sikandar shaikh at govind bag
sharad pawar honoured mohol maharashtra kesari wrestler sikandar shaikh at govind bagSakal

मोहोळ : मोहोळचा "महाराष्ट्र केसरी" पैलवान सिकंदर शेख याचा राष्ट्रवादीचे खा शरद पवार यांनी बुधवार ता 15 रोजी बारामती येथील गोविंद बागेत त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केल्याची माहिती राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी दिली.

गेल्या आठवड्यात पुण्या जवळील पुलगाव येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध सिकंदर शेख अशी लढत झाली. अवघ्या 23 सेकंदात आक्रमक कुस्ती करून पैलवान राक्षे याच्यावर "झोळी" डावाने मात करून पैलवान शेख याने अत्यंत मानाचा.

समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकाविला. यामुळे मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचले. यापूर्वी पैलवान शेख याने प्रयत्न करूनही महाराष्ट्र केसरी पासून त्याला दोन वेळा हुलकावणी बसली होती.

मात्र तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश प्राप्त झाले. यावेळी बारसकर यांच्या सह जितेंद्र अष्टुळ,प्रकाश सोनवणे,उमेश गोटे आदीजण उपस्थीत होते. दरम्यान पैलवान सिकंदर शेख याच्याकडे बारसकर यांनी पाच वर्षाचा असल्या पासून लक्ष केंद्रित केले होते. त्याला प्रत्येक ठिकाणी कुस्ती स्पर्धेला जाण्यासाठी तसेच खुराका साठी मोठी मदत केल्याचे पैलवान शेख याचे वडील रशीद शेख यांनी सांगितले.

दरम्यान इथून पुढच्या काळात काही मदत लागली तर ती करू असे आश्वासन यावेळी खा पवार यांनी दिले. दरम्यान एवढे मोठे यश संपादन करून मोहोळ तालुक्यासह जिल्ह्याचे नाव देशभरात पोचविले त्याला प्रोत्साहन म्हणून रविवार ता 19 रोजी पैलवान शेख याची मोहोळ शहरातील क्रांती भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत हत्ती वरून मिरवणूक काढणार असल्याचे बारसकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com