Sharad Pawar Visit Markatwadi: मारकटवाडीचा वणवा पेटणार का? शरद पवार अन् राहुल गांधी देणार गावाला भेट, काढणार पदयात्रा

Sharad Pawar Visit Markatwadi Marathi News : ईव्हीएमविरोधात आवाज उठवताना सोलापूर जिल्ह्यातील मारकटवाडी या गावानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला.
Rahul Gandhi and Sharad Pawar
Rahul Gandhi and Sharad Pawar
Updated on

Sharad Pawar Visit Markatwadi Marathi News : ईव्हीएमविरोधात आवाज उठवताना सोलापूर जिल्ह्यातील मारकटवाडी या गावानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस प्रशासनानं त्यांना असं करण्यापासून रोखलं होतं. पण आता मारकटवाडीच्या ग्रामस्थांनी पेटवलेल्या या आगीचा आता वणवा होतोय की काय अशी परिस्थिती होताना दिसते आहे.

कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उद्या या गावाला भेट देणार आहेत. तसंच इथल्या जनतेचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. तसंच लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे देखील मारकटवाडीला भेट देणार असून या गावात ते लाँगमार्च काढणार आहेत.

Rahul Gandhi and Sharad Pawar
EVM Scam: EVM विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी जाणार सुप्रीम कोर्टात! नुकतीच याचिका फेटाळल्यानंतर अशी घेणार काळजी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com