

Sharad Pawar smiles away Shinde’s political googly, bringing back old political memories
Sakal
सोलापूर : शरद पवार साहेब सोलापुरात आले म्हटलं की धडकीच भरते. साहेबांनी मला राजकारणात आणले, नाही तर आम्हाला कोण विचारतंय यासह अनेक गुगली ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाषणापूर्वी टाकल्या होत्या. शिंदेंनी टाकलेल्या जवळपास पाच ते सहा गुगलींवर क्रिकेटचे रसिक असलेले पवार बॅटिंग करतील, अशीच शक्यता निर्माण झाली होती. पवारांनी स्वत:ची विकेट सांभाळत शिंदेंच्या सर्व गुगलींवर ‘गुड लेफ्ट’च करणे पसंत केल्याचे सोलापुरात दिसले.