
सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४४.१ व ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद १ व २ मे रोजी झाली होती. आठवड्यातच सोलापूरच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. आज सोलापुरात ३६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आठवड्यातच सोलापूरच्या तापमानात जवळपास ८.१ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. तापमानाचा पारा घटला असला तरीही आर्द्रतेचा टक्का मात्र वाढला आहे.