Solapur : शासन आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य"शेतकऱ्यांना लाभ द्यावा - आमदार यशवंत माने

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या विविध कामासाठी मोहोळ येथे महाशिबिराचे आयोजन
shasan aplya dari Government scheme benefits to farmers MLA Yashwant Mane
shasan aplya dari Government scheme benefits to farmers MLA Yashwant Manesakal

मोहोळ : शासन आपल्या दारी ही संकल्पना सर्वसामान्यांच्या हिताची आहे. गटविभाजनाच्या कामात महसूल विभागाने यापूर्वी चांगले सहकार्य केले आहे, तहसीलदार यांनी सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा कालव्यात केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित घ्या असे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले.

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या विविध कामासाठी मोहोळ येथे महाशिबिराचे आयोजन केले होते त्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार माने बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, महिला व बालकल्याण विभागाचे किरण सूर्यवंशी,

नूतन तहसीलदार लीना खरात, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, नायब तहसीलदार भालचंद्र यादव, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नेताजी दळवे, यांच्यासह मंडल निरीक्षक, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तसेच तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या सर्व विभागाचे प्रमुख व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

shasan aplya dari Government scheme benefits to farmers MLA Yashwant Mane
Solapur : जिल्ह्यातील आशासेविकांचा पाच महिन्यांपासून पगार नाही; एक जुनपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

यावेळी माने म्हणाले सौर ऊर्जेसाठी आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढे यावे, तसेच पॉली हाऊस योजना ही राबवावी. कामगारांसाठी ज्या योजना आहेत त्यांचा त्यांना लाभ घ्यावा. यावेळी तहसीलदार बेडसे यांनी या महा शिबिराचा उद्देश विशद केला प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आपापल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली.एकुण 16 स्टॉल लावण्यात आले होते.

shasan aplya dari Government scheme benefits to farmers MLA Yashwant Mane
Solapur : घरातच अडकलेल्या अमित कामतकरांची मदतीसाठी आर्त हाक

या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ देण्यासाठी विविध दाखले प्रमाणपत्र व अन्य असे मिळून दहा हजाराचे तालुक्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे, त्यापैकी आज पर्यंत 4 हजार 523 जणांना लाभ देण्यात आला. या शिबीरात प्राथीनिधीक स्वरूपात 235 जणांना दाखले व प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आल्याचे नुतन तहसीलदार खरात यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com