
Thousands of RSS swayamsevaks participating in the centenary year procession with disciplined formations and echoing slogans.
Sakal
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त रविवारी शहरातून स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथ संचलन पार पडले. या संचलनाच्या माध्यमातून संघशक्तीचे विराट दर्शन झाले. संघदृष्ट्या शहरातील सात नगरातून हजारो स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने विविध मार्गावरून पथसंचलनाद्वारे देशभक्तीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.