

Barshi Accident
वैराग: सकाळी शेताकडे म्हैस घेऊन चालत रस्त्याने निघालेल्या व्यक्तीला मागून रिक्षाने जोरात धडक दिल्याने शेळगाव येथील ज्येष्ठ गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजाराम अण्णासाहेब वानखरे यांनी उशिराने २४ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिल्याने रिक्षा चालकाविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.