Sadabhau Khot : चिमणी गेली म्हणून मालकाला काय फरक पडत नाही; असं का म्हणाले सदाभाऊ?

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.
Sadabhau Khot
Sadabhau Khotesakal
Summary

शेतकऱ्यांची दिशाभूल करून खोटी सहानुभूती दाखवून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येण्याची तयारी करत आहेत.

सोलापूर : चिमणीचे आधीच स्थलांतर न करता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. आपण साखर कारखाना कसा वेळेत सुरु करता येईल यासाठी प्रयत्न करू असे मत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी येथे व्यक्त केले.

येथील सोलापूर विकास मंचाच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोलापूरची चादर, विडी उद्योग जगभर प्रसिद्ध लाखो कामगार काम करीत आहेत. याही उद्योगाला चालना दिली पाहिजे. माझा पिंड शेतकरी चळवळीतला आहे.

Sadabhau Khot
Cabinet Expansion : नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून कोणाला संधी? शिवसेनेतून 'ही' दोन नावं चर्चेत

विमानसेवेमुळे शहराचा विकास होत असेल,तरुणांच्या हाताला रोजगार मिळत असेल तर उत्तमच आहे. साखर कारखान्याच्या चेअरमनच्या आडमुठीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हाच चिमणीचे स्थलांतर झाले असते तर ही वेळ आली नसती.

Sadabhau Khot
Buldhana Bus Accident : 'त्यानं' जर आईच ऐकलं असतं तर कदाचित, तो आज जिवंत असता..

चिमणी गेली मालकाला काय फरक पडत नाही. उलट शेतकऱ्यांची दिशाभूल करून खोटी सहानुभूती दाखवून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येण्याची तयारी करत आहेत असा टोला त्यांनी लगावला.

Sadabhau Khot
हृदयद्रावक घटना! लग्नानंतर आखाडीसाठी बहिणीला आणायला भाऊ निघाला; पण बसमध्ये होरपळून..

साखर संचालकाकडून माहिती घेऊन कारखाना कशाप्रकारे सुरु करता येईल, याबाबत प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले. तरुणांच्या हातात रोजगार असेल तर जगाची बाजारपेठ काबीज करता येते. सोलापूर विकास मंचच्या या लढ्यासोबत असून शहराच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com