

Eknath Shinde announcing development plans for Pandharpur and welcoming new leaders into Shiv Sena.
sakal
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढावी आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी पंढरपूर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र करण्यासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, कॉरिडॉर करताना स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.