
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा: 2025 मध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलेली प्रभाग रचना पुन्हा नगरपालिकेने प्रास्तावित केली आहे. सदर प्रभाग रचना रद्द करून ती शासन निर्देशाप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करुन ही प्रभाग रचना दुरुस्त करण्यात यावी, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी व शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करत या प्रभाग रचनेवर हरकत नोंदवली.