दत्तात्रय भरणेंकडून पालकमंत्री पदाची जबाबदारी काढावी

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ताञय भरणे यांचे सोलापूर जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
Guardian Minister Dattanay Bharne
Guardian Minister Dattanay BharneEsakal

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ताञय भरणे हे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्या कामासाठी फिरत आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्य़ातील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाय योजना करण्यासाठी त्याना वेळ नाही, असा आरोप करत पालकमंञी दत्ताञय भरणे यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी काढून घ्यावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महेश चिवटे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ताञय भरणे यांचे सोलापूर जिल्ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोरोनाच्या काळात ते निष्क्रिय असल्याचे दिसून येत असून सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असताना त्यांची जिल्ह्यात कुठेही लक्ष नाही. त्यांचा शासकीय अधिकारी, पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेशी कसलाही संपर्क नाही, अशा बेफिकीर पालकमंत्र्यांकडे सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्रीची जबाबदारी काढून घेऊन ती दुसऱ्या एका सक्षम मंत्र्याकडे द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनीच पालकमंञी दत्तात्रय भरणे यांचे पालकमंञीपद बदलण्याची भूमिका घेतल्याने या विषयाची चर्चा रंगली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे प्रचंड संकट सुरु आहे. अनेक रूग्णांनाऑक्सिजन वेळेत मिळत नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी जागा मिळत नाही, यामुळे अनेकांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. यासंदर्भात पालकमंत्री यांनी अद्याप एकही बैठक घेतली नाही.

करमाळा तालुक्यात सध्या फक्त ३५ बेड उपलब्ध असून या ठिकाणी शासनाने कुठल्या प्रकारचा ऑक्सिजन उपलब्ध करून दिलेला नाही, रेडीमडिशिवर औषधासाठी रुग्णांचे प्राण जात आहेत. जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी वारंवार फोनवर संपर्क करून औषधांची मागणी केली आहे. रेमेडीसिवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नेमलेल्या कमिटीचे सदस्य फोन उचलत नाही. लॉकडाऊनची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनावर पालकमंञी दत्तात्रय भरणे यांचा कोणताही वचक राहिलेला नाही, एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जीवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे सत्तेचे पांघरून घेतलेले पालकमंत्री मात्र आपले कर्तव्याला विसरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com