
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भ्रष्टाचार, जनविरोधी धोरण, शेतकरी व कामगारांच्या समस्या, वाढती बेरोजगारी आणि कलंकित मंत्र्यांच्या सत्तेत टिकून राहण्याविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. इंडिया आघाडीतर्फे दिल्लीत आंदोलन होत असतानाच राज्यात एकाच दिवशी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले.