
सोलापूर/माढा : शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी तडकाफडकी निर्णय घेत राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर संपर्कप्रमुखांनीच राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील शिवसेनेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांना या राजीनाम्याबाबत कसलीच माहिती नव्हती.